सिकंदर’ चित्रपटातील खलनायकाच्या घरातून ११ कोटींचे ड्रग जप्त

 सिकंदर’ चित्रपटातील खलनायकाच्या घरातून ११ कोटींचे ड्रग जप्त

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या सिंकंदर या सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपटातील खलनायक खऱ्या आयुष्यातही खलनायही कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याकडून तब्बल 11 कोटींचे ड्रग्स जप्त केले गेले. तो आता गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. नायजेरियाचा नागरिक असणारा व्हिक्टर ओडिचिन्मा ओनुवाला असे या कलाकाराचे नाव असून त्याने ‘सिकंदर’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे. वसई क्राइम ब्रांच यूनिट-2 ने त्याला 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ड्रग्ससह अटक केली. व्हिक्टरला डाइक रेमंड या नावानेदेखील ओळखले जातो. त्याने ‘सिकंदर’सह तामिळ सिनेमा ‘गुड बॅड अग्ली’मध्येही काम केले आहे. तसेच तो ‘अनुपमा’ आणि CID या टीव्ही शोचाही भाग होता.

व्हिक्टर ओडिचिन्मा ओनुवाला वसई पूर्वेमध्ये असणाऱ्या एव्हरशाइन सिटीमधील महेश अपार्टमेंटमध्ये ड्रग्स साठवत होता. या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर त्याचे हे काळे कृत्य सुरू होते. क्राइम ब्रांचची टीम त्याच्यावर मागील एका महिन्यापासून लक्ष ठेवून होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे नेटवर्क फिल्म इंडस्ट्रीत पसरलेले आहे. तो तेथील लोकांना ड्रग्सचा पुरवठा करत होता.

SL/ML/SL

8 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *