देशात पहिल्यांदाच मोहाच्या वाईनची निर्मिती यशस्वी

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील वनांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या आणि आदिवासींच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या मोह वृक्षापासून विविध उत्पादने तयार केली जातात. मोहाच्या फुलांपासून तयार होणारे मद्य आदिवासींना प्रिय आहे. मात्र त्यात 50 टक्क्यापेक्षा अधिक अल्कोहोल आणि त्याचा उग्र दर्प शहरवासीयांना रुचत नाही. हेच हेरून आता आदिवासी शबरी विकास महामंडळाने या मोहा फुलांपासून वाईन तयार केली आहे. सॅम ऍग्रो या कंपनीला तीस ते चौतीस टक्के अल्कोहोल न ठेवता केवळ 12 टक्क्यांवर हे अल्कोहोल आणि त्याचा उग्र दर्प नियंत्रित करण्यात् यश आले आहे. भारतात पहिल्यांदाच याचा मान शबरी विकास महामंडळाला मिळाला आहे.
या नवीन उत्पादनामुळे मोहाच्या झाडांची लागवड आणि संवर्धनाला चालना मिळणार आहे.सध्या धुळे नंदुरबार तसंच पेठ सुरगाणा त्र्यं बकेश्वर या पट्ट्यातून ही फुलं मागवली जात आहे. आदिवासी बहुल राज्य सध्या या उपक्रमाला भेट देत आहेत. केवळ वाईनच नाही तर यापासून बिस्कीट चॉकलेट लाडू मोहाचे मध मोहा सिरप अशा अनेक गोष्टी सहज मोहाचे तेल सुद्धा तयार केले जात आहे. शबरी महामंडळाने केलेल्या या उपक्रमामुळे आदिवासींना रोजगार मिळणार असून मोह फुलांना चांगला दर मिळणार आहे.