देवगिरी किल्ल्यावरील गवताच्या आगीने घेतले भयंकर स्वरूप …

छ संभाजीनगर दि ८– छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावरील गवता ला लागली आग असून या आगीने भयंकर स्वरूप घेतले आहे. जवळपास संपूर्ण किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे ही आग विझवण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. वाढता तापमानाचा पारा, हलक्या स्वरूपाचा वारा आणि किल्ल्यावरील वाळलेले गवत आगीचा भडका घेत असल्याने नियंत्रण मिळवणे अशक्य होत असल्याचे दिसून येत आहे.
किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या आत अग्निशमन दलाचे बंब जात नसल्यामुळे अनेक अडचणी समोर येत आहेत.