पुलंचं हे नाटक तब्बल तीन दशकांनी पुन्हा रंगभूमीवर

 पुलंचं हे नाटक तब्बल तीन दशकांनी पुन्हा रंगभूमीवर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात लेखक, नाटककार, अभिनेते पु. लं देशपांडे यांच्या अजरामर साहित्यकृती आजही वाचकांना भुरळ घालतात. सुंदर मी होणार ही त्यांची अशीच एक लोकप्रिय नाट्यकृती. या नाटकात खुद्द पुलं आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी काम केले होते. त्यानंतर श्रीराम लागू, गिरिश ओक, वंदना गुप्ते या प्रसिद्ध कलाकारांनी हे नाटक सादर केले होते. त्यानंतर आता तब्बल ३० वर्षांनी हे नाटक नव्या संचात दाखल होत आहे.

पुलं’च्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई ही नवी जोडी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे.

करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित करीत असलेल्या या नाटकाचा नुकताच शानदार मुहूर्त मुंबईत संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री (पद्मश्री) नयना आपटे, पुलंचे पुतणे श्री. जयंत देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आवर्जून उपस्थित होते.

SL/ML/SL

3 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *