सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती करणार जाहीर

 सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती करणार जाहीर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे कोट्यवधीची रोकड कुठून आली, असा सवाल विचारला जाऊ लागला, त्यानंतर आता न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 आहे. यात सध्या एक पद रिक्त आहे. यातल्या 30 न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती न्यायालयाला दिली आहे. मात्र न्यायाधीशांनी दिलेल्या संपत्तीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फक्त ज्या न्यायाधीशांनी आतापर्यंत संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे, त्यांची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकान्त, न्यायमूर्ती अभय.एस. ओका, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी, न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना आणि इतर न्यायमूर्तींचा समावेश आहे.

१४ रोजी यशवंत वर्मा यांच्या राहत्या घरी आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आले होते. आग विझविताना या जवानांना कोट्यवधीची रोकड दिसली होती. आगीत अनेक नोटा जळून गेल्या होत्या. या पैशांचे काही व्हिडीओही समोर आले होते. त्यानंतरच सर्व न्यायाधीशांनी सावध होत संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *