मुलगी जन्माला आल्यास हे देवस्थान देणार दहा हजार रुपये भेट

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र व राज्य सरकारच्या ‘लेक वाचवा, लेकीला शिकवा’ या धोरणाला हातभार लावण्यासाठी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने नवजात बालिकांसाठी ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी’ योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांत ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनी जन्माला आलेल्या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना राबवण्याचा प्रस्ताव सरकारमान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
जन्माला येणाऱ्या बालिकेच्या नावाने दहा हजार रुपये मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) स्वरूपात आईच्या खात्यावर ठेवण्याची ही योजना आहे.राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना आहेत. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या अंतिम मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे निकष जाहीर केले जातील अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
SL/ML/SL
2 April 2025