बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क):
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ नोंदवली आहे. महापालिकेने निर्धारित ६,२०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचत ६,१९८ कोटी ५ लाख रुपये कर संकलन केले असून, अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात आणखी १७८ कोटी ५० लाख रुपये गोळा करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांपैकी जी दक्षिण (६२४ कोटी ५० लाख रुपये), के पूर्व (५६८ कोटी ५६ लाख रुपये), एच पूर्व (५२६ कोटी ६४ लाख रुपये) आणि के पश्चिम (५०५ कोटी रुपये) विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन केले आहे.
शहर विभाग

  • ए विभाग – २१९ कोटी १२ लाख रुपये – बी विभाग – ३६ कोटी ३३ लाख रुपये – सी विभाग – ८७ कोटी ८३ लाख रुपये – डी विभाग – २७३ कोटी ४६ लाख रुपये – ई विभाग – १५४ कोटी १६ लाख रुपये – एफ दक्षिण विभाग – १३५ कोटी २५ लाख रुपये – एफ उत्तर विभाग – १६३ कोटी २२ लाख रुपये – जी दक्षिण विभाग – ६२४ कोटी ५० लाख रुपये – जी उत्तर विभाग – २३९ कोटी ४० लाख रुपये एकूण संकलित कर रक्कम – १,९३३ कोटी २६ लाख रुपये
    पश्चिम उपनगरे
  • एच पूर्व विभाग – ५२६ कोटी ६४ लाख रुपये – एच पश्चिम विभाग – ३८२ कोटी ७४ लाख रुपये – के पूर्व विभाग – ५६८ कोटी ५६ लाख रुपये – के पश्चिम विभाग – ५०५ कोटी रुपये – पी दक्षिण विभाग – ३६३ कोटी ८७ लाख रुपये – पी उत्तर विभाग – २१४ कोटी ५६ लाख रुपये – आर दक्षिण विभाग – १७९ कोटी ३६ लाख रुपये – आर मध्य विभाग – २२२ कोटी १० लाख रुपये – आर उत्तर विभाग – ७५ कोटी ६५ लाख रुपये एकूण संकलित कर रक्कम – ३,०३८ कोटी ४९ लाख रुपये
    पूर्व उपनगरे
  • एल विभाग – २६० कोटी ६२ लाख रुपये – एम पूर्व विभाग – ८८ कोटी ४९ लाख रुपये – एम पश्चिम विभाग – १४५ कोटी ४० लाख रुपये – एन विभाग – २१९ कोटी ३७ लाख रुपये – एस विभाग – ३३० कोटी ८० लाख रुपये – टी विभाग – १७४ कोटी १२ लाख रुपये एकूण संकलित कर रक्कम – १,२१८ कोटी ७९ लाख रुपये
    महानगरपालिकेच्या या उल्लेखनीय यशामागे प्रशासनाची सातत्यपूर्ण मेहनत आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आहे. यामुळे भविष्यात अधिक सक्षम नागरी सुविधा पुरवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *