आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

 आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

✅ मार्वल – महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोसर्मेंट लि.: शक्ति प्रदत्त समितीच्या अधिपत्याखाली, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राथम्याने देणार.
(गृह विभाग)

✅ गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करणार, यासाठीच्या प्रारूप अधिनियमास मान्यता
(उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)

✅ नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगाने सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णय.
(गृह विभाग-परिवहन)

✅ बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण : 1 लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरात. रमानाथ झा समिती शिफारशी सुधारणेसह लागू करणार.
(गृह विभाग-परिवहन)

✅ नागन मध्यम प्रकल्प, जिल्हा नंदूरबार प्रकल्पासाठी 161.12 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)

✅ सिंदफणा नदीवरील निमगाव ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापूरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 22.08 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)

✅ सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब ता. शिरूर जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 17.30 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)

✅ सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) ता. गेवराई जिल्हा बीड कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी 19.66 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)

✅ वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी 1 हजार 886 कोटी ५ लाख कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता, यातील 943.025 कोटी इतकी 50% रक्कम राज्य सरकार देणार
(गृह विभाग/परिवहन)

✅ पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा आणि काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या 2008 पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर
(सार्वजनिक बांधकाम विभाग)

✅ अजनी, नागपूर येथील देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी च्या जागेवरील क्रीडांगणांचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय.
(नगरविकास विभाग)

✅ ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 500 शेतकऱ्यांना धानासाठी पणन हंगाम 2020-21 करिता प्रोत्साहनपर 79 लाख 71 हजार 292 रुपयांचे अनुदान मंजूर
(अन्न व नागरी पुरवठा)

CabinetDecisions

मंत्रिमंडळनिर्णय

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *