कोण होणार भाजपचा नवा अध्यक्ष?

 कोण होणार भाजपचा नवा अध्यक्ष?

नवी दिल्ली, दि. 1 : भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? ही चर्चा सध्या राजधानीत चांगलीच रंगली आहे. मोदी नागपूरला जाऊन आल्यानंतर तर येत्या आठवडा भरात नवीन अध्यक्ष जाहीर करण्यात येईल असे सांगितलं जातंय.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे.

२०१९ मध्ये भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. नड्डा यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर प्रभावी कार्यसंबंध प्रस्थापित केले. पक्षातील अंतर्गत सूत्राने सांगितले की, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना नड्डा यांनी आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. सध्या भाजपमधील चार महत्त्वाची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी. पुरंदरेश्वरी यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *