अलीबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा

 अलीबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा

अलिबाग दि १ —
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या. शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली १०० वर्षापासून जपली आहे.

कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. गुढीपाडव्याच्या
दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरविल्या जातात. अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टगारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात. यावेळी हिरकणी धन्या मल्हार या बोटीचा पहिला नंबर आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *