कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो मार्गाला तत्वतः मंजुरी

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांजूर मार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.राज्य सरकारने ही बदलापूरकरांना दिलेली गुढीपाडव्याची भेट असल्याची भावना आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमी लांबीचा आहे, या मार्गावर १५ स्थानके असणार आहेत. बदलापुरातून दररोज हजारो चाकरमानी मुंबईला प्रवास करीत असतात त्यांची बदलापूरपर्यंत मेट्रो यावी, अशी मागणी होती. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा वर्षांपूर्वी याबाबत मागणी केली होती. निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा विषय प्रलंबित राहिला.