कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची दुसऱ्या दिवशी हजेरी

कोल्हापूर दि २६– कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं दुसऱ्या दिवशीही वादळी वारं, मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा जोरदार पाऊस झाला.अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचलं. जोरदार वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. राधानगरी तालुक्यातील अनेक गावात, कागल तालुक्यातील मुरगुड, इचलकरंजी, जयसिंगपूर इथंही जोरदार पाऊस झाला.