उद्धव ठाकरेंची सभागृहातील उपस्थिती वाढली ….

मुंबई दि २५ — विधानपरिषदेच्या अधिवेशनात सभागृहात काहीसे अभावानेच उपस्थित असणारे उद्धव ठाकरे आज संविधानावरील चर्चेदरम्यान चक्क २७ मिनिटं सभागृहात होते. याआधी अर्थसंकल्प जाहीर होत असताना उद्धव ठाकरे यांची उपस्थिती तासाभराहून अधिक होती. आज संविधानावरील चर्चेत शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब यांनी भाषण केलं यावेळी त्यांनी शिवसेना फुटल्यानंतर आपल्यावर आणि पक्षावर कशाप्रकारे अन्याय झाल्याचं कथन केलं ,त्या दरम्यान शंभूराज देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या समोरच परब यांना टोकत होते.
माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नसले तरी विधानपरिषदेचे आमदार आहेत मात्र त्यांनी आतापर्यंत एकही वैधानिक आयुध वापरून कोणताही जन सामान्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केलेला नाही. मात्र अधिवेधनात अन्य अधिवेशनांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची उपस्थिती तुलनेने अधिक दिसली. ठाकरे यांनी सभागृहात न बोलता अनेक विषयांवर त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलण्याला प्राधान्य दिलेले पाहायला मिळाले.