पुन्हा मेरठ हत्याकांडासारखी घटना! लग्नानंतर दोन आठवड्यातच पत्नीने केला पतीचा खून

 पुन्हा मेरठ हत्याकांडासारखी घटना! लग्नानंतर दोन आठवड्यातच पत्नीने केला पतीचा खून

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येची बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे. मात्र या घटनेत त्या दोघांचे लग्न होऊन अवघे दोन आठवडे झाले होते. पोलिसांनी बायको, प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात प्रगती नामक तरुणीचे चार वर्षांपासून तिच्या गावातील अनुराग नामक तरुणाबरोबर प्रेम होते. मात्र, तिच्या कुटुंबाने ५ मार्च रोजी २२ वर्षीय दिलीप यादवशी तिचे लग्न करून दिले. या लग्नावर ती नाराज होती. तिने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं. प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग या दोघांनी दिलीपला संपवण्याचा कट रचला. अनुरागने हत्येसाठी एका व्यक्तीला दोन लाखांची सुपारी दिली. १९ मार्च ला दिलीपवर झालेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलीपला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारेकऱ्यांना शोधून त्यांची चौकशी केली या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं कबूल केलं. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रगतीसह प्रियकरालाही बेड्या ठोकल्या.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *