शेवटचा दंगलखोर सापडेपर्यंत कारवाई सुरूच राहील

नागपूर,दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सतरा मार्चला काही संघटनांनी महाल येथे औरंगजेबाचे प्रतिबंधात्मक कबर जाळली त्यावर कुराणची आयत होती असा काही जणांनी अपप्रचार केला आणि हिंसाचार, जाळपोळ केली. त्यांनतर नागपूर पोलिसांनी जे जे आवश्यक आहे त्या सर्व प्रकारचा प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलीसांनी केलेल्या आहेत. दंगलखोरांचे सगळे cctv फुटेज पोलिसांकडे आले असून चित्रीकरणामध्ये जे जे लोक दिसत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नागपूरचे पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या सह नागपूर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
नागपूर जाळपोळ,हिंसाचार प्रकरणात 104 लोकांची ओळख पटली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे , यामध्ये 92 वयस्क असून 12 विधी संघर्षित बालक असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सोशल मीडियाचा वापर करुन विविध पोस्ट केल्या गेल्या ज्यामध्ये हिंसा भडकवली त्यांनाही आता सहआरोपी केले जाणार आहे. सद्यस्थितीत आपत्तीजनक 68 पोस्ट शोधून त्यांना डिलिट केले आहे.नागपुरात हिंसाचार खपऊन घेतल्या जाणार नसून शेवटचा दंगलखोर जोपर्यंत पकडण्यात येणारं नाही तोपर्यन्त पोलिसांची कारवाई अशीच सुरूच राहणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या जाळपोळीत ज्यांचे नुकसान झाले त्या सर्व पीडितांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात देण्यात येईल. तसेच लागू असलेल्या निर्बंधात आज पासून टप्प्याटप्प्याने शिथीलता दिली जाईल.असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याशिवाय नुकसान भरपाई दंगल खोरांकडून वसूल केली जाईल. दंगलखोरांनी नुकसानीचे पैसे दिले नाही तर त्यांची मालमत्ता विकून नुकसान भरपाई केली जाणार आहे. तसेच जेथे आवश्यकता असेल तेथे बुलडोजर चालविल्या जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले .महिला कॉन्स्टेबल सोबत अभद्र व्यवहार झालेला नाही मात्र महिला कॉन्स्टेबल वर दगडफेक करण्यात आली होती असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.