जोरदारच! १३ ठिकाणी होणार IPL २०२५ चा उद्घाटन सोहळा

२२ मार्चपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ची सुरुवात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी BCCIनं मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे 18वे पर्व चाहत्यांसाठीही खास बनवण्यासाठी सर्व 13 ठिकाणी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. पहिला सोहळा कोलकाता येथे होणार असून इतर १२ ठिकाणाचे आयोजन अजून सुरू आहे. त्यामुळे त्या जागांची नावे अद्याप BCCI ने जाहीर केलेली नाहीत