उपसभापतींच्या विश्वासदर्शक ठरावानंतर विधानपरिषदेत गदारोळ

 उपसभापतींच्या विश्वासदर्शक ठरावानंतर विधानपरिषदेत गदारोळ

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला, भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी या विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध करत त्यावर आक्षेप घेतला त्यावर मोठा गदारोळ झाला, सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने विरोधक संतप्त झाले , घोषणाबाजी झाली , कामकाज दोन वेळा तहकूब झाले आणि शेवटी विरोधकांनी सभात्याग केला.

हा विश्वासदर्शक प्रस्ताव सभापतींनी कोणत्या नियमाखाली मांडायला परवानगी दिली आणि तो मंजूर करून घेतला अशी विचारणा करत विरोधकांनी हौद्यात उतरून सभापतींविरोधात घोषणाबाजी केली. सभापतींना कोंडीत पकडून त्यांच्या अधिकारांना आव्हान देणं योग्य नाही असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

विरोधकांनी केलेल्या या गदारोळामुळे कामकाज दोनदा स्थगित करावं लागलं. सत्तारूढ बाजूने या गदारोळात कामकाज रेटून नेले , सभापती आपल्या म्हणण्याला दाद देत नाहीत हे पाहून विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होताच हाच मुद्दा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी पुढील कामकाज पुकारले.

ML/ML/PGB 19 Mar 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *