उपसभापतींवरील अविश्वास प्रस्ताव विधानपरिषदेत फेटाळला

 उपसभापतींवरील अविश्वास प्रस्ताव विधानपरिषदेत फेटाळला

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला.

विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापतींना दिली होती मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या विहित निकषांची पूर्तता झालेली नाही आणि पदावरून दूर करण्यासाठी ठोस कारण यात दिलेलं नाही असं सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळताना सांगितलं.मात्र हा प्रस्ताव देताना निकषांची पूर्तता केली असून हा प्रस्ताव मांडू द्यावा आणि मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबठा पक्षाचे अनिल परब यांनी केली मात्र सभापती आपल्या निर्णयावर कायम राहिले.

ML/ML/SL

18 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *