हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या व्यक्तीने ISI ला दिली गगनयानाची गोपनीय माहिती

 हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या व्यक्तीने ISI ला दिली गगनयानाची गोपनीय माहिती

लखनौ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क):

संरक्षण दलाशी संबंधित विभागातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या हनिट्रॅपमध्ये अडकला आहे. हा व्यक्ती ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमॅन आहे. त्याने गगनयान प्रोजक्ट आणि ड्रोनची माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली आहे. त्याला उत्तर प्रदेशातील एंटी टेररिस्ट क्सक्वॉडने अटक केली आहे.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरी चार्जमन रवींद्र कुमार आणि त्याच्या एका साथीदाराला आग्रा येथून अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला गुप्त लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.रवींद्रकुमार हा पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे तपासातून समोर आले. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या महिला एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्रकुमार याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती घेऊ लागली. तिच्या जाळ्यात रवींद्रकुमार चांगलाच अडकला.

पाकिस्तीनी आयएसआय एजंटने रवींद्रकुमार याला तिचे नाव नेहा शर्मा सांगितले. तिने फेसबुकवर बनावट खाते तयार करुन रवींद्रकुमार याला फसवले. त्यानंतर पैसांची लालच देवून रवींद्र कुमार याला फसवत राहिली. रवींद्रकुमार याने ऑर्डनन्स फॅक्टरी फिरोजाबादशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे तिला म्हणजेच पाकिस्तानला पाठवली होती. यामध्ये आयुध कारखान्याच्या दैनंदिन उत्पादन अहवालाचाही समावेश आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *