विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा अतिउष्ण तापमान इशारा…

चंद्रपूर दि १४ :–हवामान खात्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा तापमानाचा इशारा दिला आहे. अकोला -यवतमाळ- चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी आगामी 24 तासाचा अतिउष्ण तापमान इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसात चंद्रपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाने मोठी उसळी घेतली आहे. होळी नंतर तापमानात झालेली मोठी वाढ नागरिकांसाठी चिंताजनक ठरली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडी जाणवत होती. मात्र त्यानंतर अचानक पारा उंचावला आणि आता मागील 10 दिवसांच्या सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाली आहे. मार्चच्या मध्यात तापमान 42 अंश सेल्सियसपर्यंत धडकल्याने आगामी काळात पारा चढाच राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.