कारगिलमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप, जम्मू-काश्मीर, लडाखमध्येही हादरे

देशाच्या काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. लडाखच्या कारगिलमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. रात्री 2.50 मिनिटांपासून हे धक्के जाणवले. कारगिलसोबतच संपूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.