अजित पवारांच्या घरी वाजणार सनई-चौघडे, जय पवार लवकरच लग्नबंधनात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिलला साखरपुडा होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न होणार आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा यांनी मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. दोघांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. यावेळी त्यांनी आजी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यांनीच जय पवारांचे लग्न ठरल्याची बातमी दिली.