यानात तांत्रिक बिघाड, लॉंचिंग रद्द झाल्याने सुनिता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास लांबला

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी नासा अथक प्रयत्न करत आहे. त्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी नासाने स्पेसएक्स क्रू 10 मोहिम लाँचिंगच्या अवघे काही तास आधी रद्द केल्याची घोषणा केली. दोन्ही अंतराळविरांच्या ठिकाणी नवी टीम पाठवण्याचं ठरवलं होतं. पण लाँचिंगच्या चार तास आधी इंजिनिअर्सना रॉकेटच्या हायड्रोलिक सिस्टिममध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे लॉचिंग रद्द करण्यात आले. यामुळे सुनिता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास लांबला आहे.