शक्तिपीठ महामार्ग करू , लादणार नाही

 शक्तिपीठ महामार्ग करू , लादणार नाही

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या महामार्ग उभारला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली.

कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे, कोल्हापुरातल्या एक हजार शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कोल्हापूरसह वर्धा , यवतमाळ , सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदनं प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं. महामार्गाला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट – पाचपट भाव मिळेल त्यातून शेतकरी अधिक जागा खरेदी करू शकतात , त्यामुळे विरोधकांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. हा महामार्ग उभारणं अट्टाहास नाही मात्र या महामार्गामुळे मराठवड्यातल्या आणि विदर्भातल्या जिल्ह्यांचं जीवनमान अभूतपूर्व बदलणार आहे असं फडणवीस म्हणाले.

ML/SL/ML

13 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *