पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसने दिला सर्वोच्च सन्मान, ठरले पहिलेच भारतीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसने सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत. पंतप्रधान मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा 21 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. “मॉरिशसच्या लोकांनी आणि सरकारने मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय नम्रपणे मोठ्या आदराने स्वीकारतो. हा केवळ माझ्यासाठी सन्मान नाही, तर भारत आणि मॉरिशसमधील ऐतिहासिक बंधनाचा सन्मान आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.