नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स
 
					
    मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील पाण्याचे स्त्रोत आणि नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरावरील सर्व संबंधित विभागांचा मिळून एक टास्क फोर्स निर्माण केला जाणार असून त्यासंदर्भातली संपूर्ण योजना लवकरच विधानसभेसमोर मांडली जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली . या संदर्भातील एका लक्षवेधी सूचनेवर त्या उत्तर देत होत्या शंकर जगताप, बापूसाहेब पठारे, भीमराव तापकीर आदी सदस्यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
पर्यावरणाशी संबंधित एक स्वतंत्र समिती नेमून सरकारी आणि खाजगी मलशुद्धीकरण प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील योजना आखण्यात येणार आहे. नदी आणि पाण्याचे स्रोत यांचे प्रदूषण रोखण्यासाठी निर्माण करण्यात यायच्या टास्क फोर्स मध्ये नगर विकास, जलसंपदा, ग्रामविकास , उद्योग आणि पर्यावरण विभागांचे एकत्रित सहकार्य घेण्यात येणार आहे असेही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
ML/ML/SL
7 March 2025
 
                             
                                     
                                    