मुख्यमंत्र्यांची घोषणा, राज्यातील दीड कोटी ग्राहक वीजबिल मुक्त होणार
 
					
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी ७ मार्च रोजी अनेक मोठ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या हेत. त्यांनी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी क्रांतिकारक योजना जाहीर केल्या असून, यातून लाखो ग्राहकांना वीजबिल मुक्ती मिळणार आहे. प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, त्याचा थेट फायदा ७०% ग्राहकांना मिळेल.
 
                             
                                     
                                    