शेतशिवारात बहरली उन्हाळी तूर, शेतकऱ्यांचा नवा प्रयोग यशस्वी
वाशीम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम तालुक्यातील ब्रम्हा शेतशिवारात उन्हाळी तुरीचा बहरलेले पीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक लागवड केली असून, २ एकर क्षेत्रात घेतलेल्या या पिकाला चांगले यश मिळताना दिसत आहे.
सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली आहे. योग्य पद्धतीने सिंचन आणि खत व्यवस्थापन केल्यास उन्हाळी तूर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.तुरीचे दरही सध्या समाधानकारक असून, हंगामात योग्य उत्पादन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे खरीप आणि रब्बी हंगामात सातत्याने अडचणी येत असताना, उन्हाळी तुरीसारखी पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय ठरू शकते.
ML/ML/SL
5 March 2025