राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश
नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉग्रेसनेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहू गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी कोर्टात ऑनलाइन उपस्थिती न दर्शवता प्रत्यक्षरित्या उपस्थित राहण्याचे नाशिक कोर्टाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. त्या सुनावणीला राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. आता कोर्टाच्या आदेशानंतर मे महिन्यात असलेल्या पुढील सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेवेळी सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचप्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज सावरकर अपमानास्पद विधानाप्रकरणी सुनावणी होती. यावेळी राहुल गांधी यांनी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र राहुल गांधी त्यांच्या वकिलांमार्फत हजर राहिले. त्यामुळे आता यापुढील सुनावणीवेळी राहुल गांधींनी ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष कोर्टात येऊन आपली बाजू मांडावी असे आदेश त्यांना कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी याबाबत बोलताना दिली आहे.
SL/ML/SL
1 March. 2025
SL/ML/SL