उत्तराखंडात हिमस्खलनामुळे गाडले गेले ५७ कामगार

चमोली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सातच्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगार ८ कंटेनर आणि एका शेडमध्ये होते. बद्रीनाथला लागून असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ची टीम चमोली-बद्रीनाथ महामार्गावरील बर्फ हटवण्याचे काम करत आहे.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती मिळताच, आयबेक्स ब्रिगेडचे १०० हून अधिक जवान तातडीने बचाव कार्यात सहभागी झाले. यामध्ये डॉक्टर आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सकाळी ११.५० वाजता, पथकाने पाच कंटेनर शोधले आणि १० कामगारांना वाचवले. या लोकांना जोशीमठ आणि माना येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. १० पैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, उर्वरित ३ कंटेनरचा शोध सुरू आहे. आतापर्यंत एकूण १६ कामगारांना वाचवण्यात आले आहे. ४१ जणांचा शोध सुरूच आहे. लष्कराव्यतिरिक्त, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि बीआरओच्या तुकड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताबाबत राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाच्या (SDRF) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे.
येथे चमोली-बद्रीनाथ महामार्गाचे काम सुरू आहे.मजूर रस्त्याचे काम करीत असताना अचानक हिमस्खलन होऊन बर्फाचा भलामोठा कडा खाली कोसळला. घटनेचे वृत्त कळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांसह बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची (इंडो-तिबेट बीआरओ) पथके घटनास्थळी दाखल झाली. हा भाग भारत -चीन सीमेलगत आहे. इंडो-तिबेट बीआरओच्या वतीने हे महामार्गाचे काम सध्या काम सुरू आहे. गेले ४८ तास उत्तराखंडमध्ये बेफाम बर्फवृष्टी होत आहे.येथील सर्व शिखरे बर्फाने झाकली गेली आहेत
ML/ML/SL
28 Feb. 2025