ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाली लाखो कासवांची गर्दी

ओडिशाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कासवांनी गर्दी केली आहे. ओडिशा राज्यातील रुशिकुल्य रुकरी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे भारतातील कासवांच्या (ऑलिव्ह रिडली कासव) सर्वात मोठ्या सामूहिक घरट्यांसाठी ओळखले जाते. येथे हजारो कासवे प्रत्येक वर्षी अंडी घालण्यासाठी येतात. यंदा येथे कासवांनी विक्रम केला आहे. पोदामपेटा ते बटेश्वरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या तब्बल 6.41 लाखांहून अधिक कासवांनी अंडी दिली आहेत. तसेच, भारतीय तटरक्षक दलाने या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी आणि कासवांचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ड्रोन, जहाजे आणि विमानांचा वापर करून ‘ऑपरेशन ऑलिव्हिया’ सुरू केले आहे.