पैसखांब मंदिरात विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे सामुहिक वाचन

अहिल्यानगर दि २३ — नेवासा येथील पैस खांब मंदिरात ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचे सामुहिक वाचन केले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय याच्या वतीने ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सहकाऱ्याने जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.