मोबाईलमध्ये मिळणार पीएफची रक्कम, येत्या ३ महिन्यात युपीआय सुविधा सुरू

पुढच्या तीन महिन्यांत कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) सुरू केली आहे. ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला ईपीएफ काढू शकणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफ’चे दावे जलद गतीनं सोडवले जावेत तसेच विना अडथळा व्हावेत, यासाठी भारत सरकारनं काही सुधारणा हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत यूपीआयद्वारा ईपीएफ काढण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. ईपीएफओनं एक योजनाही त्यासाठी तयार केली आहे.लवकरच याबाबत अंमलबजावणी सुरू होणार आहे.