आशा ताईंनी काढली विकीची दृष्ट… व्हिडिओ व्हायरल

सध्या विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची खूप चर्चा आहे. विकिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. सर्व स्तरातून है कौतुक होत आहे. अगदी विकीच्या घरची मंडळीही भारावून गेली आहेत. चित्रपट पाहून विकीच्या घरी बरीच वर्ष काम करणाऱ्या आशा ताईंनी त्याची दृष्ट काढली आहे. त्याचा व्हिडिओ विकीने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअऱ करताना विकी लिहितो, “आशा ताईंनी मला आयुष्यात मोठं होताना पाहिलेलं आहे. कालच त्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्या म्हणाल्या, उभे राहा, नजर काढायची आहे तुमची… ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्या नेहमीच माझी काळजी करत असतात. माझ्या आयुष्यात त्या आहेत याचा मला खरंच खूप आनंद आहे.” हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.