वाशीमच्या द्राक्ष बागांना सन बर्निंगचा फटका

वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यात मोजकीच लागवड असलेल्या द्राक्षबागा यंदा चांगल्या बहरल्या असताना अचानक तापमान वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. जिल्ह्यात दुपारी तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून, त्यामुळे द्राक्ष फळांचं मोठ्या प्रमाणात सन बर्निंग होत आहे. याचा थेट फटका उत्पादनाला बसणार असून किमान 20 टक्के फळं खराब होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
रिसोड तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी संजय पवार यांनी मोठ्या मेहनतीने द्राक्ष बाग फुलवली मात्र उष्णता वाढीमुळे फळं खराब होत आहेत. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून आर्थिक फटका बसणार आहे.या परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
ML/ ML/ SL
20 Feb 2025