चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टिम इंडियाला मिळाली नवी जर्सी, ‘या ‘कारणामुळे फोटोशूट चर्चेत

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा येत्या बुधवारपासून म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे.. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघाने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. यामुळेच भारताची जर्सी आता खूप चर्चेत आली आहे. यंदा स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने पाकिस्तानच्या नावाचा उल्लेखही या जर्सीवर आहे. त्यामुळे जर्सीवर स्पर्धेचा लोगो आणि यजमान पाकिस्तानचे नाव लिहिले आहे. या स्पर्धेचा अखेरचा सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होणाऱ्या टीम्स
• ए ग्रुप – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश
• बी ग्रुप- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान
ML/ML/PGB 18 Feb 2025