ज्येष्ठ शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि रंजकतेने सादर करणारे पंडित प्रभाकर कारेकर यांचे काल रात्री निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कारेकर यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठीही अनेक संगीताचे कार्यक्रम केले. ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय ठरला. संगीत क्षेत्राशी संबंधित कार्यशाळा घेणे, देशोदेशी होणाऱ्या संगीत विषयक परिषद-कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याबरोबरच अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे शिक्षण दिले.
पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म 1944 साली गोव्यात झाला होता. पण त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडं मुंबईत झालं होतं. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल…, करिता विचार सापडले वर्म…, वक्रतुंड महाकाय… यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. कारेकरांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांतक विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
SL/ML/SL
13 Feb. 2025
पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म 1944साली गोव्यात झाला होता. पण त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडं मुंबईत झालं होतं. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल…, करिता विचार सापडले वर्म…, वक्रतुंड महाकाय… यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. कारेकरांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांतक विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.