इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेला वांशिक शिवीगाळ

लंडन, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवतावादाचे धडे देणाऱ्या पाश्चात्य देशांतील नागरिकांमध्ये वंशश्रेष्ठतेची पाळेमुळे रुजलेली असल्याचे अधुनमधुन घडणाऱ्या घटनामधुन दिसून येते. नुकतीच लंडनमध्ये एका ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एका भारतीय वंशाच्या महिलेल्या वांशिक शिवीगाळ झाल्याची गंभीर घटना घडली आहे. लंडनहून ब्रिटनमधील मँचेस्टरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका दारुड्याने तिला शिवीगाळ केली. . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. , गॅब्रिएल फोर्सिथ ही महिला ट्रेन मध्ये मैत्रिणीशी बोलत होती . तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले की मी स्थलांतरितांना मदत करणाऱ्या एका धर्मादाय संस्थेत काम करते. हे ऐकून, जवळच उभ्या असलेल्या एका दारुद्याने तिच्यावर संतापून तिला वांशिक शिवीगाळ केली .इतकेच नव्हे तर इंग्रजांनी जगावर कसे अधिराज्य गाजवले याचे गोडवे गाऊ लागला. तो पुढे म्हणाला तुझा हा स्थलांतरित लोकांबाबतचा दावा केवळ तू इंग्लंड मध्ये आहेस म्हणून एकूण घेतला जाईल. इतर देशात नाही. इंग्रजांनी जग जिंकले होते आणि भारतावरही १५० वर्ष राज्य केले हे विसरू नकोस असेही तो म्हणाला.
गॅब्रिएलने नंतर इंस्टाग्रामवर या वादाचा व्हिडियो पोस्ट केला.त्यात म्हटलेय “इमिग्रंट हा शब्द ऐकताच तो भडकला.” आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला . तो वेड्यासारखा झाला होता. मी सुरक्षिततेसाठी व्हिडिओ बनवला आहे.दुसऱ्या ट्विटमध्ये गॅब्रिएलने लिहिले की, ‘एक भारतीय आणि एका स्थलांतरिताची मुलगी असल्याने, मला माझ्या इतिहासाशी आणि वारशाशी जोडलेले राहणे आवश्यक आहे.’ मी स्वतःसाठी आणि काळ्या लोकांसाठी उभी राहू शकले याबद्दल मी कृतज्ञ आहे. या घटनेची तक्रार ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांकडे करण्यात आली आहे.
SL/ML/SL
13 Feb. 2025