जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक …

चंद्रपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनएएफटी आणि आरटीजीएस करण्याची ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी तब्बल ३ कोटी ७० लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँक व्यवस्थापकांनी याबाबतची तक्रार रामनगर सायबर पोलिस ठाण्यात केली आहे. जिल्ह्यात असा प्रकार पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार जिल्हाभरात झाला आहे. येथील खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप आहे. त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात. या बँकेतून दररोज आरटीजीएस आणि एनएएफटी केली जाते. दरम्यान, ७फेब्रुवारी तसेच १० फेब्रुवारीला अज्ञाताने आरटीजीएस – एनएएफटी करण्याची ऑनलाइन प्रक्रियाच हॅक करून तेथून सर्व रक्कम दिल्ली तथा नोएडा येथील बँक खात्यावर वळती केली. ही बाब समोर येताच बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली. दरम्यान, व्यवस्थापकांनी रामनगर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती – तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला
आहे.

ML/ML/PGB 13 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *