राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

 राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्या,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

सत्येंद्र दास यांनी अनेक वर्षे राम मंदिरात सेवा केली होती. त्यांचा समर्पित स्वभाव आणि धार्मिक कार्यातील योगदान यामुळे त्यांना मोठा आदर मिळाला होता. तर अंत्यसंस्कार 13 फेब्रुवारीला अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर होणार आहेत.

अनेक श्रद्धाळूंनी आणि भाविकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राम जन्मभूमीच्या ऐतिहासिक घटनेशी त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचे निधन धार्मिक विश्वासाठी मोठी हानी मानली जात आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *