डोंबिवलीकर युवक देतोय मराठी भाषेचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

डोंबिवली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील मराठीचा वापर वाढल्याचे दिसत आहे. मराठी भाषिक प्रदेशात राहत असल्यामुळे परदेशातील नागरिकांना आपल्या भाषेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्याची इच्छा होत आहे. मात्र अजूनही ज्यांना आपली भाषा पुन्हा एकदा पद्धतशीरपणे शिकून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. हे हेरून आपल्या भाषेचा प्रसार व्हावा यासाठी डोंबिवलीकर युवक विशेष प्रयत्न करत आहे. अशा सगळ्यांसाठी घरबसल्या मराठी भाषा शिकता यावी, यासाठी डोंबिवलीकर कौशिक लेले याने ऑनलाईन ट्युटोरियल तयार केले आहेत.
कोशिकच्या http://LearnMarathiWithKaushik.com या वेबसाईट आणि त्याच्या चॅनलवर भाषेचे धडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व उपक्रम पूर्णपणे मोफत आहेत. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला कौशिक भारतीय भाषांची सेवा म्हणून हे उपक्रम चालवत आहे. कौशिकला या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब सांभाळून पुन्हा डोंबिवलीत शनिवार-रविवारी येऊन बेसिक लेवलपासून मराठी भाषा शिकवण्याचे काम तो करतो. आतापर्यंत त्याने 400 हुन अधिक जणांना भाषेचे धडे दिलेले आहेत.
SL/ML/SL
11 Feb. 2025