देशभरातील लष्कराच्या हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण

 देशभरातील लष्कराच्या हजारो एकर जमिनीवर अतिक्रमण

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात जवळपास १८ लाख एकर संरक्षण विभागाची जमीन असल्याचे केंद्र सरकारने काल संसदेत सांगितले. लष्कराच्या जमिनीवर जवळपास १०,२४९ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशातील अतिक्रमणाअंतर्गत संरक्षण भूमी विभागनिहाय डेटा सरकारकडे मागितला होता. त्यावर मंत्र्यांनी उत्तरात दिले.

याच्या ६ महिने आधी संसदेत प्रश्न विचारला होता तेव्हा मंत्र्यांनी सांगितले होते की, देशभरात १०,३५४ एकर संरक्षण क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे. हा आकडा सांगितलेल्या आकड्यापेक्षा जास्त आहे. अवैध कब्जा उत्तर प्रदेशात(४१७५९.२ एकर) आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रात १०१०.३ एकर, प.बंगालमध्ये ८१६ एकर लष्करी जमिनीवर अतिक्रमण आहे.

SL/ML/SL

11 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *