पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 एकरवरील पेरूची बागच कापून टाकली…

जालना, दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात 4 पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 एकरवरील पेरूच्या बागेवर झाडं कपण्याचे मशीन चालवून हजारो पेरूची झाडं कापून टाकली आहेत. पेरूच्या शेतीतून मशागतीचाही खर्च निघत नसल्याने भोकरदन येथील पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडले.
आर्थिक संकटात सापडलेल्या या 4 पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या 15 एकरवरील पेरू बागेवर चक्क झाड कापण्याच मशीन चालवले आहे. भोकरदन येथील शेतकरी अप्पाराव देशमुख, अरुण देशमुख, सिदूसिंग डोभाळ आणि सुरेश तळेकर यांनी मिळून 15 एकर शेत जमिनीवर पेरूची बाग फुलवली होती. त्यांनी 3 वर्षांपूर्वी आपल्या 15 एकर शेतात लखनौ 49 जातींची सुमारे हजारो पेरूची रोपं लावली होती. त्यांनतर रोपांचे झाडात रूपांतर होऊन झाडाला पेरूही चांगले आले. मात्र, पेरुला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. या परिस्थितीने हताश झालेल्या 4 पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या 15 एकरवरील हजारो पेरूची झाडं मशीनने कापून टाकली आहेत.
ML/ML/SL
11 Feb. 2025