कार, ट्रकच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू, दोन मुलं गंभीर जखमी

गुजरातच्या अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलं गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.