रतन टाटांचे मृत्यूपत्र समोर, मोहिनी दत्ता यांना दिले इतके कोटी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिवंगत रतन टाटा यांच्या नुकत्याच उघडलेल्या मृत्युपत्रात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती म्हणजेच 500 कोटींहून अधिक रक्कम मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूर येथील रहिवासी असून ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतात. टाटांनी मोहिनी यांना इतकी मोठी रक्कम का दिली हा चर्चेचा विषय ठरत आहे.
ML/ML/PGB 7 Feb 2025