ब्राझीलमध्ये भारतीय गायीची तब्बल ४० कोटी रुपयांना विक्री

 ब्राझीलमध्ये भारतीय गायीची तब्बल ४० कोटी रुपयांना विक्री

मिनास गेराईस, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्राझीलमधील येथे झालेल्या लिलावात भारतीय वंशाच्या गायीची तब्बल ४० कोटी रुपयांना विक्री झाली आहे. भारतीय वंशातील नेल्लोर प्रकारातील ही गाय आहे. नेल्लोर हा गायीचा प्रकार भारतात ओंगोल म्हणूनही ओळखला जातो. आंध्रप्रदेशातील ओंगोल प्रदेशातील या गायी अति उष्णतेचा सामना करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. वियाटिना-१९ या गायीचे वजन ११०१ किलो आहे. जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे. वियाटिना-१९ ने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

वियाटिना-१९ ही एक असामान्य गाय आहे. दुर्लभ जेनेटिक्स आणि शरीर वैशिष्ट्यामुळे या गायीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिष्ठत अशा चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत या गायीला ‘मिस साऊथ अमेरिकेचा’ किताब मिळाला होता.जगातील विविध पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी तिचे भ्रूण जगभर निर्यात केले जातात.या गायींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम असते त्यामुळे त्यांना आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये खूप खास बनवते.

कमीत कमीत देखभाल खर्च सोबत वेगळ्या वातावरणात जीवंत राहण्याची या गोवंश प्रकाराची क्षमता वियाटिना-१९ ला विशेष बनवते. या गायीच्या शारीरिक रचनेमुळे ती अधिक आकर्षक दिसते. पांढरा रंग, पाठीवरील कुबड आणि सैल त्वचा यामुळे गाय सुंदर दिसते.
SL/ML/SL
6 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *