SRT तंत्र : किफायतशीर, शाश्वत शेतीचा मूलमंत्र – कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे

SRT तंत्र : किफायतशीर, शाश्वत शेतीचा मूलमंत्र MMC – वर्तमान / MMC – Vartaman च्या या नवीन एपिसोडमध्ये आम्ही भारतीय कृषी पर्यटनाचे जनक आणि SRT हे किफायतशीर कृषी तंत्र विकसित करणारे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्याशी संवाद साधला आहे. जागतिक हवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करत संवर्धित, शाश्वत आणि किफायतशीर शेती कशी करायची याचे मार्गदर्शन भडसावळे सरांनी या मुलाखतीत केले आहे. अमेरिकेत उच्चशिक्षण घेतल्यानंतर सत्तरच्या दशकात रायगड जिल्ह्यातील नेरळ जवळील गावात स्थायिक होऊन आदर्श शेती आणि कृषी पर्यटनाचे मॉडेल त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांसमोर उभे केले आहे. शेतीसाठी कोणती पद्धत योग्य सेंद्रीय, नैसर्गिक की रासायनिक या चक्रात न अडकता या साऱ्याचा योग्य समन्वय साधत त्यांनी विकसित केलेले SRT तंत्रज्ञान आज हजारो शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे. जागतिक परिप्रेक्षातून भारतीय शेतीकडे पाहत भविष्यातील आव्हाने कशी पेलायची,त्यासाठी काय करायचे याबाबत त्यांनी अगदी सुस्पष्ट मार्गदर्शन केले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या पार्श्वभूमीवर भडसावळे सरांची ही मुलाखत खुपच मौलिक मार्गदर्शन करणारी आहे.

हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. MMC-Vartaman channel ला Like,Share and Subscribe करा.

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *