राज्यातील पहिला गो पर्यटन प्रकल्प
पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील पहिलाच गो पर्यटन प्रकल्प राबवला जात आहे. इथे सर्व देशी गोवंशी गाईची माहिती मिळणार आहे. मनाच्या शांतीसाठी गाईबरोबर वेळ घालवणे असणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संशोधन केंद्रात 12 प्रकारच्या गाईंच्या ब्रीड या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 गाई, भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या 5 गाई या गो परीक्रमा या युनिटमध्ये पाहिला मिळतात. हा राज्यातील एकमेव प्रकल्प असून एकाच ठिकाणी या सर्व गाई पाहिला मिळतात.
इथे ग्रुपनुसार नोंदणी करू शकता. शनिवार, रविवार या बॅच घेतल्या जातात. गाईच्या सहवासात वेळ घालवणे, गाईला कुरवाळणे, मिठी मारणे या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा इथे घेता येतो. याची एक बॅच ही मागील आठवड्यात झाली असून भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहिवाल, गीर, लाल सिंधी, थारपारकर व राठी या पाचही गायी आणि वळूंचे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात एकत्रित करून संगोपन केले जात आहे.
विशेष म्हणजे दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे हे पाचही देशी दुधाळ गोवंश एकत्र उपलब्ध असणारे हे देशातील एकमेव केंद्र आहे. याशिवाय या केंद्रावर महाराष्ट्रातील खिलार, कोकण कपिला, डांगी, देवणी, लाल कंधारी आणि गौळाऊ या गायींच्या जातींबरोबरच आंध्र प्रदेशातील जगातील सर्वात लहान उंचीची पुंगनूर आणि मिनीएचर पुंगनूर गायीचे देखील याठिकाणी संगोपन केले जाते.
SL/ML/SL
4 Feb. 2025