राष्ट्रपती भवनात CPRF अधिकारी पूनम गुप्ता यांचे शुभमंगल
राष्ट्रपती भवनात 12 फेब्रुवारीला महिला अधिकारी पूनम गुप्ता यांचा विवाह सोहळा होणार आहे. पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर म्हणजे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचं सुरक्षेबाबतच नेतृत्व आणि कार्यशैलीमुळे खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रभावित झाल्या आहेत. याच पूनम गुप्ता यांनी प्रजासत्ताकदिनी पथसंचलनात सीआरपीएफच्या महिला पथकाचं नेतृत्व केलं होतं.