धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाचा झाला मृत्यू, आणखी एक जखमी
नंदुरबार, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीमध्ये चाकू हल्ल्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
टोळक्याने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात दोन राजस्थानी प्रवासी जखमी झाले होते. यातील 27 वर्षांच्या सुमेरसिंग जबरसिंग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मयत सुमेरसिंग आणि त्याच्या बहिणीचे 20 तारखेला लग्न असल्याने तो भावांसोबत चेन्नईहून जोधपूरला जात होता. मात्र लग्नाच्याआधीच सुमेरसिंग याचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जोपर्यंत आरोपींना जेरबंद केलं जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा सुमेरसिंग याच्या नातेवाईकांनी घेतला आहे. दुसरीकडे हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यासाठी करणी सेनाही आक्रमक झाली आहे.
दरम्यान रेल्वे दुर्घटनेतील नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या विपणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली, त्यानंतर जयकुमार रावल यांनी सीसीटीव्हीबाबत लोहमार्ग पोलीसच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांना विचारणा केली. रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार, दोंडाईचा, अंमळनेर, नवापूर या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जयकुमार रावल यांनी केला आहे.
ML/ML/PGB
3 Feb 2025